शाळेत शिकवणारे शिक्षक कसे आहे? शिकवणारे शिक्षक किती चांगले प्रशिक्षीत आहे?
विद्यार्थी मानसशास्त्र शिक्षकांना किती माहीत आहे? शाळेत प्रत्यक्ष कृतिशील शिक्षण पद्धती आहे का? प्रत्येक मूल हे एकमेव अद्वितीय असते आणि त्याची शिकण्याची पद्धत आणि गती वेगवेगळी असते हे जाणून मुलांना शिकण्याची संधी शाळा उपलब्ध करून देते का? या विषयी गांभीर्य अजिबात नसते आणि शाळा निवडली जाते. विद्यार्थ्याचा शाळेत प्रवेश होत नसेल तर फी व्यतिरिक्त डोनेशन | देऊन देखील प्रवेश घेतला जातो….
पालकांसाठी शाळा ही एक एखादं प्रॉडक्ट तयार करणारी फॅक्टरी होऊन जाते.. शाळेकडून आणि विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. मुलांना शाळेत किती समजते, यापेक्षा पाठांतर त्यांचे हस्ताक्षर यावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं जातं. मुलं त्यालाच शिक्षण समजतात, आणि काही मुलं त्यात निपुण देखील होतात पण पुढे जाऊन त्याला कळते की संकल्पना समजुन घेणे, मिळवलेल्या ज्ञानाच उपयोग करणे, नवनिर्मिती, संशोधन, Out of Box Thinking हे देखील तेवढंच महत्त्वाचं होत, मग स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुन्हा त्याला वेगळा अभ्यास करावा लागत वेगळे कोचिंग क्लास लावाववे लागतात.