सर्रास बोलले जाणारे वाक्य ‘लोकांची मानसिकताच बदलली आहे.’ ‘त्यांची मानसिकताच राहिली नाही…’ मानसिकतेला इंग्रजी Mindset असं आपण म्हणतो. आता ही मानसिकता हा Mindset जर खरोखर बदलला असेल तर मग शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांची देखील मानसिकता Mindset बदलला असावा, आणि जर बदलला असेल तर मग याचा शिक्षण या प्रक्रियेवर देखील परिणाम होणे स्वाभाविकच आहे. सर्वप्रथम आपण विचार करुया तो पालकांच्या मानसिकतेचा कारण विद्यार्थी स्वतः ठरवत नाही की त्याला कोणत्या शाळेत कोणत्या शिक्षकांकडे शिकायला जायचं ते? आता पालकांची मानसिकता शाळा निवडतांना कशी बदलली आहे आणि शाळा निवडतांना कोणत्या गोष्टीक ते पाहतात…. शाळेची फी किती आहे? जेवढी जास्त फी तितकी चांगली शाळा. इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे कल जास्त असतो. शाळा कोणत्या मंडळाशी संलग्न आहे (STATE BOARD / CBSC / ICSE etc.) शाळेची इमारत कशी आहे? परिसर कसा आहे? शाळेचा ड्रेस, येण्याजाण्याची व्यवस्था, सहशालेय उपक्रम… सर्वात महत्त्वाचं शाळेकडे स्टेटस म्हणून बघणे.