शिक्षणा सोबत कौशल्य ज्ञान ही काळाची गरज बनलेली आहे. भविष्यात सर्वांसाठी नोकऱ्या उपलब्ध होतीलच याची शक्यता नाहीच. सोबतच टॅलेंट असलेली व्यक्तीच या स्पर्धेत टिकू शकणार आहे. यासाठी काळाची पावले ओळखून आजच शिक्षण पद्धतीत बदल करणे अनिवार्य आहे नाहीतर तुमचे सुद्धा जुने व्हर्जन होण्यास वेळ लागणार नाही.
यासाठी शिक्षणासोबत कौशल्य (प्रॅक्टिकल) शिक्षण अनिवार्य झाले आहे.म्हणूनच शिक्षणासोबत कौशल्य शिक्षण देण्यावर माझा भर असतो याचाच एक भाग म्हणून रुद्रा स्कुल आयोजित STEM फेस्ट मध्ये सादर करण्यात आलेली टॉयलेट क्लीनर, ब्लॅक फिनाईल, व्हाईट फिनाईल, हँड वॉश ही उत्पादने शाळेतील सायन्स लॅब मध्ये तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. ही उत्पादने जशी तयार करण्यातच प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच ते आता विकण्याचे कौशल्यही त्यांना शिकविले जाणार आहे. उत्पादन करणे जेवढे सोपे तेवढेच ते विकणेही कठीण आहे यासाठी वाकचतुर्य (Presentation) महत्वाचे आहे. शालेय जिवनातच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक तयार व्हावा यासाठी माझी धडपड आहे. यासाठी माझ्या शाळेच्या पालकांचे मला मोठया प्रमाणावर योगदान मिळत आहे. मी मनापासून त्याचे आभार मानते की ते माझ्या भावना व कळकळ समजून सतत नवनवीन प्रयोगांमध्ये मध्ये मला सहकार्य करीत आहे.