नोकरी मिळवण्यासाठीच शिकायचं असतं. मग सर्व खटाटोप सुरू होतो ज्या कॉलेजातील अधिका | अधिक विद्यार्थी नोकरीला लागले अशाच शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला जातो. मग कोणत्याही प्रकारे त्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा, चढाओढ.. ती शिक्षण संस्था जर खाजगी मालकीची असेल तर मागेल ती फी देऊन ऍडमिशन घेणे. जर सरकारी मालकीची असेल तर लग्गेबाजी.. ही मानसिकता एका दिवसात तयार झाली नसून ती हळूहळू टप्या टप्प्याने तयार झाली आहे. अर्थात शिक्षण म्हणजे कारकून तयार करण्याचा कारखाना नसून एक सृजनशील कर्तव्यदक्ष नागरिक घडवण्यासाठी तयार केलेली एक प्रक्रिया आहे हे समाजाच्या गळी उतरविण्यासाठी काही काळ जावा लागेल. ‘विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता परीक्षार्थी बनला आहे.’ हे जवळ जवळ १००% सत्या आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण ‘शिक्षण म्हणजे त्या त्या विषयाची परीक्षा देऊन पास होणे म्हणजे शिक्षण’ ही शिक्षणाची व्याख्या रूढ होते की अशी भीती कधी कधी वाटायला लागते. कारण सर्व काही एखादी परिक्षा पास होण्यासाठी चाललेले असते जणू काही ती परीक्षा म्हणजेच जीव आहे जणू.