शासनापेक्षा पालकांची सर्वात महत्वाची भूमिका

* पब बंद करा म्हणण्यापेक्षा आपण जाणे बंद करा म्हणजे आपोआप पब बंद होतील. आपल्यासाठी काय योग्य काय वाईट हे दुसरा कसे ठरवेल. ही ओळख स्वतः करता येणाराच खऱ्या अर्थाने सुशिक्षित म्हणावा लागेल. पाल्याला योग्य अयोग्य घरतूनच शिकवा जेणे करून तो खऱ्या अर्थान देशाचा सुशिक्षित नागरिक बनेल.
* जे आम्हाला मिळालं नाही, सुख उपभोक्ता आल नाही ते पाल्यांना मिळायला हवं या स्वैराचार्यामुळे असंख्य मूले-मुली आपल्या जीवनाची दिशा चुकत आहे. उच्च शिक्षणासाठी ग्लॅमरस ठरणाऱ्या कॉलेजास विद्यार्थ्यांची पसंती आपण बघतो आहोत. कॉलेज वा क्लासच्या नाव खाली घरातून निघून पाठीवर बॅग अडकून हिंडणारी जोडपी आपणास शहरात नजरेस पडल्यावाचून राहत नाही.
* आपला पाल्य घरातून कॉलेज वा क्लासला जाताना खरच सभ्य विद्यार्थ्यां सारखा वाटतोय की, छपरी दिसतोय याकडे सुद्धा काही पालकांचे. दुर्लक्ष आहे. तो किंवा ती खरोखर कॉलेजात / क्लासला जाताय का? उशिरा पर्यन्त बाहेर का राहता ? त्यांचे मित्र मैत्रीण योग्य आहेत काय? ते व्यसनाच्या आहारी तर नाहीत ना? या सारख्या
बारीक बाबींवर आईचे लक्ष असणे अपेक्षित असते.


पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत पाल्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी जवळ जवळ आई सांभाळत असते आणि वडील आपल्या नोकरी/व्यवसायात व्यस्त असतांना आपण बघतो. जसे शिवरायांच्या जडण घडणात शहाजी राजांचे ही मोलाचे स्थान होते, तरी ही प्रथम संस्कार करणाऱ्या माँ साहेब जिजाऊ होत्या. म्हणून शिवबा घडले आणि छत्रपती शिवाजी राजे झालेत हे आपण जाणतोच. परंतु हे किती आत्मसात करतो यावर चिंतन करणे गरजेचे आहे. आजचे चित्र भयावह आहे. मुली फॅशनच्या नावखाली तोकडे कपडे घालून उशिरापर्यन्त मित्रांना सोबत बाहेर असतात. याला काही विचारवंत अभिव्यक्ति स्वातंत्र म्हणून मानतात आणि काही अनर्थ घडलाच तर खापर प्रशासनाच्या माथ्यावर फोडून मोकळे होतात. प्रशासनाचा ‘धाक राहिला नाही’ अशी ओरड करतात. अहो तुमचा तरी धाक आहे काय त्यांना? आपण सर्रास शासन / प्रशासनांला जबाबदार ठरवितो. परंतु खरं तर आपणच आपल्या पाल्याच्या बरबादीला जबाबदार असतो हेच सत्य आहे.

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *